Saturday, December 3, 2022

दिव्यांगांच्या बाबतीतली मानसिकता बदलणे गरजेचे : सोनाली नवांगूळ

 आज दि 3 डिसेंबर 2022 रोजी माझ्या कॉलेज मध्ये दिव्यांग सेल चे उदघाटन झाले . त्या प्रसंगी उदघाटक म्हणून (साहित्य आकदमी पुरस्कर 2020) प्राप्त मा. सोनाली नवांगूळ , कोल्हापूर ह्या होत्या तर या प्रसंगी दि न्यू मिरज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. विनायकरावजी गोखले , संस्थेचे सचिव आदरणीय श्री.राजू झाडबुके , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उल्हास माळकर , उपप्राचार्या डॉ.सुनीता माळी , पर्यवेशिका नलिनी प्रज्ञासूर्य , अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक डॉ. माधुरी देशमुख आणि दिव्यांग सेल चे प्रमुख डॉ.गंगाधर चव्हाण व सहकारी प्राध्यापक वर्ग आणि प्रशासकीय कर्मचारी व विध्यार्थिनी उपस्थित होत्या. ह्या समाजिक बदलाची सुरवात अशीच उत्तरोत्तर वाढत जावो. ह्या कार्यासाठी मला प्रोत्साहित केल्या बद्धल मी सदैव सर्वांचा मनःपूर्वक आभारी आहे.


*संवेदनशील मानव होणे हेच मानवाच्या समोरील उद्दिष्ट . मा. सोनाली नवांगुळ यांचे प्रतिपादन*


*जागतिक दिव्यांग दिनानिमित्त कन्या महाविद्यालयात व्याख्यान संपन्न....*



मिरज : जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून कन्या महाविद्यालय मिरज च्या दिव्यांग सक्षमीकरण समितीमार्फत ( साहित्य अकादमी पुरस्कार 2020) प्राप्त मा. सोनाली नवांगुळ मॅडम यांचे व्याख्यान संपन्न झाले. कन्या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विध्यार्थिनींचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच दिव्यांग सेलचेही उदघाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. आपल्या व्याख्यानात सोनाली नवांगुळ यांनी  दिव्यांग  व्यक्तींच्या बाबतीतील सामाजिक मानसिकता, दिव्यांगाला  सामाजिक जीवनामध्ये येणारे अडथळे, दिव्यांगांच्या जीवन जगतानाच्या  सामाजिक समस्या, दिव्यांगांच्या वैयक्तिक आणि शारीरिक समस्या , मानसिक, भावनिक, आर्थिक समस्या इत्यादी विषयावर सोनाली नवांगुळ मॅडमनी विद्यार्थिनी सोबत मनमोकळ्या पद्धतीने त्यांना विषय समजून सांगितले. दिव्यांग म्हणून होत असलेलं सामाजिकरण, दिव्यांग म्हणून समाजामध्ये असलेले स्थान .दिव्यांगांविषयी सामाजिक जनजागृती होणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी आपल्या व्याख्यानातून बोलून दाखवले. सदरील कार्यक्रमासाठी दि न्यू मिरज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. विनायकरावजी गोखले हे कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिले. कार्यक्रमाला प्रमुख उपास्थिती  संस्थेचे सचिव मा. राजू झाडबुके यांची लाभली , कन्या महाविद्यालयाचे सचिव डॉ. उल्हास माळकर, महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.सुनीता माळी , पर्यवेशिका सौ.नलिनी प्रज्ञासूर्य , बळवंतराव मराठे माध्यमिक विद्यालयाचे  श्री. शशिकांत कुंभार हे सर्वजन उपस्थित राहिले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व संयोजन डॉ. गंगाधर चव्हाण यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांची ओळख अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक डॉ. माधुरी देशमुख यांनी करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सागर पाटील यांनी केले तर आभार प्रा.रचना शहा यांनी मानले. सदरील कार्यक्रमासाठी अनेक समाजिक कार्यकर्ते, दिव्यांग बांधव आणि विध्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते .















Thursday, December 1, 2022

जागतिक दिव्यांग दिन विशेष व्याख्यान : सोनाली नवांगूळ

 


जागतिक दिव्यांग दिनानिमित्त कन्या महाविद्यालयात व्याख्यान


मिरज: कन्या महाविद्यालय मिरज , दिव्यांग सक्षमीकरण समिती ने  जागतिक दिव्यांग दिनानिमित्त (साहित्य अकादमी पुरस्कर 2020) प्राप्त मा. सोनाली नवांगुळ यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे .नवांगुळ मॅडम ह्या कोल्हापूर च्या दिव्यांग चळवळीतील नामवंत आणि क्रियाशील सामाजिक कार्यकर्त्या आहेत. सदरील कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून दि न्यू मिरज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री. विनायक गोखले आणि सचिव मा.श्री.राजू झाडबुके हे उपस्थित राहणार आहेत. सर्व दिव्यांग बांधवानी , सामाजिक कार्यकर्त्यांनी , समाजातील संवेदनशील नागरिकांनी सदरील व्याख्यानाचा लाभ घ्यावा. असे आवाहन प्राचार्य श्री. उल्हास माळकर यांनी केले आहे.

Friday, October 21, 2022

समाजशास्त्र विभागाच्या भित्तीपत्रिकेचे प्रकाशन संपन्न

*कन्या महाविद्यालयात समाजशास्त्र विभागातर्फे भित्तीपत्रिकेचे अनावरण* मिरज : कन्या महाविद्यालय मिरज , समाजशास्त्र विभागातर्फे भित्तीपत्रिकेचे अनावरण महाविद्यालयाचे मा.प्राचार्य डॉ.उल्हास माळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. सदरील भित्तीपत्रिका ही समाजशास्त्राचा परिचय या विषयावर समाजशास्त्राच्या विध्यार्थिनींनी तयार केली. एकोणीसाव्या शतकात एक स्वतंत्र शास्त्र म्हणून समाजशास्त्र उदयास आलेले आहे. तेव्हापासून वैज्ञानिक दृष्टीकोनातून मानवी समाजिक घटनांचा अभ्यास समाजशास्त्रात केला जाऊ लागला. समाजशास्त्रात प्रामुख्याने सामाजिक घटनांचा, सामाजिक संबंधांचा, सामाजिक अंतर्क्रियेचा, सामाजिक संस्थांचा , मानवी समूहांचा, शहरी , ग्रामीण आणि आदिम समाजाच्या संस्कृतीचा अभ्यास समाजशास्त्रात केला जातो. त्याचबरोबर समाजशास्त्रात अनेक संशोधने झाली आहेत त्या संशोधनावर आधारित सिद्धांत निर्मिती होत आहे आणि हे सिद्धांत त्रिकालबाधित सत्य असलेले आपल्याला दिसून येतात. सिद्धांत निर्मितीमध्ये अनेक समाजशास्त्रज्ञांनी मोलाचे योगदान दिले आहे . त्यात ऑगस्ट कॉमते, कार्ल मार्क्स, एमील दुर्खीम, मॅक्स वेबर, हर्बर्ट स्पेन्सर , जॉर्ज सिमेल, डॉ.जी.एस.घुर्यें, एन. एन. श्रीनिवास , टी. एन. मुजुमदार, ए.आर.देसाई, डी. पी.मुखर्जी इत्यादींनी केलेल्या संशोधनाचा आढावा सदरील भित्तीपत्रिकेमध्ये घेण्यात आला.कार्यक्रमाप्रसंगी श्रुती घोगरे या विध्यार्थिनीने भित्तीपत्रिकेची भूमिका आणि उद्देश स्पष्ट केला . कार्यक्रमाचे नियोजन आणि संयोजन समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.गंगाधर चव्हाण यांनी केले , ह्या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू, भगिनी आणि विध्यार्थिनी उपस्थित होत्या.

Tuesday, October 18, 2022

समाजाच्या अध्ययनात समाजशास्त्राची भूमिका महत्वाची . प्रा.डॉ. रुपाली सांभारे यांचे प्रतिपादन

*समाजाच्या अध्ययनासाठी समाजशास्त्र अत्यंत मोलाची भूमिका बजावते.* डॉ. प्रा. रुपाली सांभारे यांचे प्रतिपादन मिरज : कन्या महाविद्यालय मिरज , अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि समाजशास्त्र विभाग आयोजित "समाजशास्त्राची उपयोगिता" या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. त्या प्रसंगी व्याख्यात्या म्हणून दत्ताजीराव कदम आर्टस् कॉमर्स सायन्स कॉलेज, इचलकरंजी येथील समाजशास्त्राच्या प्राध्यापिका प्रा.डॉ.रुपाली सांभारे ह्या बोलत होत्या. बोलताना पुढे त्यांनी समाजिकशास्त्रांची समाजातील भूमिका, समाजशास्त्राचा अभ्यास विषय, समाजिक समस्यांचा अभ्यास करताना समाजशास्त्राचा होणारा उपयोग , समाजशास्त्राचा व्यावहारिक जीवनातील उपयोग, करियरच्या दृष्टीने होणारे फायदे तसेच एमील दुर्खीम यांचा आत्महत्तेचा सिद्धांत आजच्या सद्य परिस्थित कसा लागू पडतो हे त्यांनी अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले. भारतीय समाजापुढील आव्हाने कमी करण्यासाठी समाजशास्त्र अनेक अंगाने उपयोगाचे आहे अशे प्रतिपादन व्याख्यानाद्वारे केले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास माळकर हे उपस्थित होते. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या प्रमुख डॉ. माधुरी देशमुख , महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू भगिनी आणि समाजशास्त्र विषयाच्या विध्यार्थिनी उपस्थित राहिल्या. कार्यक्रमाचे स्वागत प्रस्ताविक समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ.गंगाधर चव्हाण यांनी केले, सूत्रसंचालनाची भूमिका प्रा. डॉ. शबाना हळगळी यांनी पार पडली. कार्यक्रमासाठी तांत्रिक सहकार्य प्रा.रमेश कट्टीमनी यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ.विनायक पवार यांनी मानले. https://fb.watch/gcz-stXxZ6/ व्याख्यान: समाजशास्त्राची उपयोगिता पूर्ण व्याख्यान ऐकण्यासाठी वरील लिंकला क्लिक करा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.

राष्ट्रीय गृहिणी दिवस विशेष लेख : लक्ष्मी यादव

 "घरात तर असतेस, काय काम असतं तुला?" या डायलॉगने भारतातील अनेक घरांची सकाळ होत असते. " मी गृहिणी आहे, काही काम करत नाही. घरात...