Friday, October 21, 2022
समाजशास्त्र विभागाच्या भित्तीपत्रिकेचे प्रकाशन संपन्न
*कन्या महाविद्यालयात समाजशास्त्र विभागातर्फे भित्तीपत्रिकेचे अनावरण*
मिरज : कन्या महाविद्यालय मिरज , समाजशास्त्र विभागातर्फे भित्तीपत्रिकेचे अनावरण महाविद्यालयाचे मा.प्राचार्य डॉ.उल्हास माळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. सदरील भित्तीपत्रिका ही समाजशास्त्राचा परिचय या विषयावर समाजशास्त्राच्या विध्यार्थिनींनी तयार केली. एकोणीसाव्या शतकात एक स्वतंत्र शास्त्र म्हणून समाजशास्त्र उदयास आलेले आहे. तेव्हापासून वैज्ञानिक दृष्टीकोनातून मानवी समाजिक घटनांचा अभ्यास समाजशास्त्रात केला जाऊ लागला. समाजशास्त्रात प्रामुख्याने सामाजिक घटनांचा, सामाजिक संबंधांचा, सामाजिक अंतर्क्रियेचा, सामाजिक संस्थांचा , मानवी समूहांचा, शहरी , ग्रामीण आणि आदिम समाजाच्या संस्कृतीचा अभ्यास समाजशास्त्रात केला जातो. त्याचबरोबर समाजशास्त्रात अनेक संशोधने झाली आहेत त्या संशोधनावर आधारित सिद्धांत निर्मिती होत आहे आणि हे सिद्धांत त्रिकालबाधित सत्य असलेले आपल्याला दिसून येतात. सिद्धांत निर्मितीमध्ये अनेक समाजशास्त्रज्ञांनी मोलाचे योगदान दिले आहे . त्यात ऑगस्ट कॉमते, कार्ल मार्क्स, एमील दुर्खीम, मॅक्स वेबर, हर्बर्ट स्पेन्सर , जॉर्ज सिमेल, डॉ.जी.एस.घुर्यें, एन. एन. श्रीनिवास , टी. एन. मुजुमदार, ए.आर.देसाई, डी. पी.मुखर्जी इत्यादींनी केलेल्या संशोधनाचा आढावा सदरील भित्तीपत्रिकेमध्ये घेण्यात आला.कार्यक्रमाप्रसंगी श्रुती घोगरे या विध्यार्थिनीने भित्तीपत्रिकेची भूमिका आणि उद्देश स्पष्ट केला . कार्यक्रमाचे नियोजन आणि संयोजन समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.गंगाधर चव्हाण यांनी केले , ह्या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू, भगिनी आणि विध्यार्थिनी उपस्थित होत्या.
Subscribe to:
Post Comments (Atom)
राष्ट्रीय गृहिणी दिवस विशेष लेख : लक्ष्मी यादव
"घरात तर असतेस, काय काम असतं तुला?" या डायलॉगने भारतातील अनेक घरांची सकाळ होत असते. " मी गृहिणी आहे, काही काम करत नाही. घरात...
-
*कन्या महाविद्यालय मिरज येथे* *राखी प्रशिक्षण कार्यशाळा – उत्साहात पार पडली** मिरज, दि. 31 जुलै: समाजशास्त्र विभाग व माजी विद्यार्थिनी संघ...
-
कन्या महाविद्यालयात मिरज येथील विद्यार्थिनींची जलक्रांती फिशरीज ला अभ्यास भेट कन्या महाविद्यालयात मिरज येथील समाजशास्त्र व राज्यशास्त्र विभ...
-
"समाजशास्त्राचे शिक्षण हवे अनिवार्य" या विधानाच्या संदर्भात खालीलप्रमाणे सविस्तर स्पष्टीकरण देता येईल: 🔷 1. समाजशास्त्र म्हणजे...

No comments:
Post a Comment