Saturday, December 3, 2022

दिव्यांगांच्या बाबतीतली मानसिकता बदलणे गरजेचे : सोनाली नवांगूळ

 आज दि 3 डिसेंबर 2022 रोजी माझ्या कॉलेज मध्ये दिव्यांग सेल चे उदघाटन झाले . त्या प्रसंगी उदघाटक म्हणून (साहित्य आकदमी पुरस्कर 2020) प्राप्त मा. सोनाली नवांगूळ , कोल्हापूर ह्या होत्या तर या प्रसंगी दि न्यू मिरज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. विनायकरावजी गोखले , संस्थेचे सचिव आदरणीय श्री.राजू झाडबुके , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उल्हास माळकर , उपप्राचार्या डॉ.सुनीता माळी , पर्यवेशिका नलिनी प्रज्ञासूर्य , अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक डॉ. माधुरी देशमुख आणि दिव्यांग सेल चे प्रमुख डॉ.गंगाधर चव्हाण व सहकारी प्राध्यापक वर्ग आणि प्रशासकीय कर्मचारी व विध्यार्थिनी उपस्थित होत्या. ह्या समाजिक बदलाची सुरवात अशीच उत्तरोत्तर वाढत जावो. ह्या कार्यासाठी मला प्रोत्साहित केल्या बद्धल मी सदैव सर्वांचा मनःपूर्वक आभारी आहे.


*संवेदनशील मानव होणे हेच मानवाच्या समोरील उद्दिष्ट . मा. सोनाली नवांगुळ यांचे प्रतिपादन*


*जागतिक दिव्यांग दिनानिमित्त कन्या महाविद्यालयात व्याख्यान संपन्न....*



मिरज : जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून कन्या महाविद्यालय मिरज च्या दिव्यांग सक्षमीकरण समितीमार्फत ( साहित्य अकादमी पुरस्कार 2020) प्राप्त मा. सोनाली नवांगुळ मॅडम यांचे व्याख्यान संपन्न झाले. कन्या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विध्यार्थिनींचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच दिव्यांग सेलचेही उदघाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. आपल्या व्याख्यानात सोनाली नवांगुळ यांनी  दिव्यांग  व्यक्तींच्या बाबतीतील सामाजिक मानसिकता, दिव्यांगाला  सामाजिक जीवनामध्ये येणारे अडथळे, दिव्यांगांच्या जीवन जगतानाच्या  सामाजिक समस्या, दिव्यांगांच्या वैयक्तिक आणि शारीरिक समस्या , मानसिक, भावनिक, आर्थिक समस्या इत्यादी विषयावर सोनाली नवांगुळ मॅडमनी विद्यार्थिनी सोबत मनमोकळ्या पद्धतीने त्यांना विषय समजून सांगितले. दिव्यांग म्हणून होत असलेलं सामाजिकरण, दिव्यांग म्हणून समाजामध्ये असलेले स्थान .दिव्यांगांविषयी सामाजिक जनजागृती होणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी आपल्या व्याख्यानातून बोलून दाखवले. सदरील कार्यक्रमासाठी दि न्यू मिरज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. विनायकरावजी गोखले हे कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिले. कार्यक्रमाला प्रमुख उपास्थिती  संस्थेचे सचिव मा. राजू झाडबुके यांची लाभली , कन्या महाविद्यालयाचे सचिव डॉ. उल्हास माळकर, महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.सुनीता माळी , पर्यवेशिका सौ.नलिनी प्रज्ञासूर्य , बळवंतराव मराठे माध्यमिक विद्यालयाचे  श्री. शशिकांत कुंभार हे सर्वजन उपस्थित राहिले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व संयोजन डॉ. गंगाधर चव्हाण यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांची ओळख अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक डॉ. माधुरी देशमुख यांनी करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सागर पाटील यांनी केले तर आभार प्रा.रचना शहा यांनी मानले. सदरील कार्यक्रमासाठी अनेक समाजिक कार्यकर्ते, दिव्यांग बांधव आणि विध्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते .















No comments:

Post a Comment