Tuesday, October 18, 2022
समाजाच्या अध्ययनात समाजशास्त्राची भूमिका महत्वाची . प्रा.डॉ. रुपाली सांभारे यांचे प्रतिपादन
*समाजाच्या अध्ययनासाठी समाजशास्त्र अत्यंत मोलाची भूमिका बजावते.* डॉ. प्रा. रुपाली सांभारे यांचे प्रतिपादन
मिरज : कन्या महाविद्यालय मिरज , अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि समाजशास्त्र विभाग आयोजित "समाजशास्त्राची उपयोगिता" या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. त्या प्रसंगी व्याख्यात्या म्हणून दत्ताजीराव कदम आर्टस् कॉमर्स सायन्स कॉलेज, इचलकरंजी येथील समाजशास्त्राच्या प्राध्यापिका प्रा.डॉ.रुपाली सांभारे ह्या बोलत होत्या. बोलताना पुढे त्यांनी समाजिकशास्त्रांची समाजातील भूमिका, समाजशास्त्राचा अभ्यास विषय, समाजिक समस्यांचा अभ्यास करताना समाजशास्त्राचा होणारा उपयोग , समाजशास्त्राचा व्यावहारिक जीवनातील उपयोग, करियरच्या दृष्टीने होणारे फायदे तसेच एमील दुर्खीम यांचा आत्महत्तेचा सिद्धांत आजच्या सद्य परिस्थित कसा लागू पडतो हे त्यांनी अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले. भारतीय समाजापुढील आव्हाने कमी करण्यासाठी समाजशास्त्र अनेक अंगाने उपयोगाचे आहे अशे प्रतिपादन व्याख्यानाद्वारे केले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास माळकर हे उपस्थित होते. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या प्रमुख डॉ. माधुरी देशमुख , महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू भगिनी आणि समाजशास्त्र विषयाच्या विध्यार्थिनी उपस्थित राहिल्या. कार्यक्रमाचे स्वागत प्रस्ताविक समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ.गंगाधर चव्हाण यांनी केले, सूत्रसंचालनाची भूमिका प्रा. डॉ. शबाना हळगळी यांनी पार पडली. कार्यक्रमासाठी तांत्रिक सहकार्य प्रा.रमेश कट्टीमनी यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ.विनायक पवार यांनी मानले.
https://fb.watch/gcz-stXxZ6/
व्याख्यान: समाजशास्त्राची उपयोगिता
पूर्ण व्याख्यान ऐकण्यासाठी वरील लिंकला क्लिक करा.
आपल्या सूचनांचे स्वागत आहे. प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment