Saturday, December 16, 2023

आस्था बेघर निवासी केंद्रास कन्या महाविद्यालय मिरजच्या विध्यार्थिनींची अभ्यास भेट















*आस्था बेघर निवासी केंद्रास कन्या महाविद्यालय मिरजच्या  विध्यार्थिनींची अभ्यास भेट*


कन्या महाविद्यालय मिरज च्या समाजशास्त्र व राज्यशास्त्र विभागाने दि. 14 डिसेंबर रोजी बेघर लोकांच्या सामाजिक समस्या जाणून घेण्यासाठी मिरजेतील आस्था बेघर निवासी केंद्रास सदिच्छा भेट दिली. त्याप्रसंगी पत्रकार व माहिती अधिकार वक्ते  श्री.शाहीन शेख यांनी विध्यार्थिनींना सविस्तर माहिती दिली. त्याप्रसंगी त्यांनी बेघर लोकांच्या अस्तित्वाची जाणीव समाजाला होणे आवश्यक आहे, त्यांच्यावर त्यांच्याच घरच्यांनी व समाजतील लोकांनी बेघर होण्याची वेळ आणली आहे, बेघर लोकांना शासन देखील अनुदान देत नाही ते सर्वार्थाने निराधार आहेत. त्यांना आपल्यासारख्या सामाजिक जाणीवा जागृत असलेल्या लोकांच्या मदतीच्या हाताची आवश्यकता आहे . बेघर लोकांना कोणीही प्रेमाने, आपुलकीने बोलत नाही. त्यांना  समारंभात,उत्सवात,धार्मिक कार्यात कोणीही सहभागी करून घेत नाही. त्यांना नातेवाईक आहेत पण त्यांनी त्यांना आपल्यापासून दूर लोटले आहे . त्याच्या बाबतीत ते बेफिकीर आहेत. बेघरांचा सांभाळ करताना आमच्या सर्वांची दमछाक होते . त्यांना वेळेवर उपचार देणे, विवाह योग्य असेल तर विवाह लावून देणे, आजारपणात त्यांची सेवा करणे, मतिमंद लोकांना त्यांच्या कलाने संभाळणे, त्यांना खाऊ- पिऊ घालणे, वेळेवर औषध गोळ्या घ्यायला लावणे, कोणी मृत्यू पावल्यास त्यांचा अंत्यविधी आम्हाला स्वतः पार पडावा लागतो. बेघर व्यक्ती दिसल्यास सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच आम्ही त्याला ह्या निवारा केंद्रात आणतो. आपल्याला कोणी असा बेघर व्यक्ती दिसल्यास किव्हा आपल्या आजूबाजूला असा कोणी व्यक्ती राहत असल्यास आम्हाला कळवा असे आव्हान श्री.शाहीन शेख व केंद्र संचालिका सौ.सुरेखा शाहीन शेख यांनी केले. याप्रसंगी मुलीच्या हस्ते बेघर लोकांना जीवनोपयोगी साहित्य देऊन त्यांना आधार देण्याचे काम करण्यात आले मुलींमध्ये सामाजिक जाणीवा विकसित व्हाव्यात म्हणून या अभ्यास भेटीचे  नियोजन करण्यात आले होते. अभ्यास भेटीचे संयोजन प्रा.डॉ. गंगाधर बालू चव्हाण व प्रा.डॉ. शबाना हळगळी यांनी केले. याप्रसंगी प्रा.डॉ. कविता सुल्ह्यान, प्रा.डॉ. विनायक पवार ,प्रा.विद्या पाटील व समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र विभागाच्या सुकन्या उपस्थित होत्या.

Sunday, December 10, 2023

भेदभावाचे उच्चाटन करून मानव अधिकाराचे रक्षण करूया - शाहीन् शेख

 


https://youtu.be/hmKsl5_Nroo?si=wBDard3NH_CQ2jAx


भाषणाचा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी वरील लिंक ला क्लीक करा.

Friday, October 20, 2023

समाजशास्त्र विभागातर्फे सेमिनार संपन्न.

 दिनांक 9 ऑक्टोबर 2023 रोजी समाजशास्त्र विभागामार्फत विध्यार्थिनींचा सेमिनार घेण्यात आला ज्यामुळे विद्यार्थ्यांना विषय निवडण्याचे , निवडलेल्या विषयाची माहिती जमा करण्याचे, मिळवलेल्या माहितीचे सादरीकरण घेताना घ्यावयाची काळजी आणि बोलण्याचा आत्मविश्वास निर्माण करण्याचे कौशल्य विकसित होयला मदत होईल. सर्व विध्यार्थिनींनी सदरील सेमिनार मध्ये हरिरीने सहभाग नोंदवला. या प्रसंगी परीक्षक म्हणून समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ गंगाधर चव्हाण यांनी काम पाहिले व सादरीकारणामध्ये सुधारणा सुचवून मार्गदर्शन केले.


















Wednesday, September 13, 2023

समाजशास्त्र विभागातर्फे सामाजिक समस्या या विषयावरील पोस्टर प्रदर्शन संपन्न .


 *मिरजेच्या कन्या महाविद्यालयात समाजशास्त्र विभागातर्फे पोस्टर प्रदर्शन संपन्न*


कन्या महाविद्यालय मिरज, समाजशास्त्र विभागातर्फे भारतातील सामाजिक समस्या या विषयावरील पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रा. डॉ. उल्हास माळकर सर  यांच्या हस्ते संपन्न झाले. सध्या भारतीय समाजाला  अनेक सामाजिक समस्यांनी ग्रासले आहे. सामाजिक समस्यांमुळे समाजाचे सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे. सामाजिक विकासात अनेक अडथळे यामुळे निर्माण झाले आहेत. सामाजिक विकासाची गती वाढवायची असेल तर सामाजिक समस्यांचा प्रभाव कमी होणे अत्यंत आवश्य्यक आहे , ही जाणीव ठेवून समाजशास्त्र विभागाच्या अभ्यासक विध्यार्थिनींनी सामाजिक समस्यांवर पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन केले . त्यात महागाई, बेरोजगारी, आत्महत्या, भ्रष्टाचार, स्त्रीभ्रूणहत्या, दारिद्र्य, संप्रदायवाद , आरक्षणाच्या समस्या, लोकसंख्यावाढ, लिंगभेद, हुंडाबळी, प्रदूषण ,बालगुन्हेगारी, व्यसनाधीनता, आरोग्याच्या समस्या, कौटुंबिक हिंसाचार, घटस्फोट,  झोपडपट्टी, सायबर क्राईम , अंधश्रद्धा, निरक्षरता, अज्ञान अश्या अनेक सामाजिक समस्या घेऊन त्याबाबततीत विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती विकसित व्हावी या उद्देशाने सदरील पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन केले. या प्रसंगी कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. गंगाधर चव्हाण यांनी केले. सामाजिक समस्या कमी करण्यासाठी त्यावर उपाययोजना शोधून त्या उपायांची अंमलबजावी होणे गरजेचे आहे व सामाजिक समस्याचा प्रभाव कमी करण्यासाठी समाजातील सर्व सुजाण नागरिकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे , असे प्रतिपादन प्रा.चव्हाण यांनी  केले. याप्रसंगी महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. सागर पाटील, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.विनायक वनमोरे, प्रा. रमेश कट्टीमनी, प्रा. डॉ. विनायक पवार, प्रा.डॉ.कविता सुल्ह्यान, प्रा.रश्मी फलटणकर, प्रा.डॉ. किरण कदम, प्रा.डॉ.शबाना हळगळी, प्रा. संतोष शेळके व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू, भगिनी आणि समाजशास्त्र विभागाच्या सर्व विध्यार्थिनी उपस्थित होत्या. सदरील कार्यक्रमाचे नियोजन समाजशास्त्र विभागाच्या सर्व विद्यार्थिनींनी केले.














राष्ट्रीय गृहिणी दिवस विशेष लेख : लक्ष्मी यादव

 "घरात तर असतेस, काय काम असतं तुला?" या डायलॉगने भारतातील अनेक घरांची सकाळ होत असते. " मी गृहिणी आहे, काही काम करत नाही. घरात...