Friday, December 22, 2023
Saturday, December 16, 2023
आस्था बेघर निवासी केंद्रास कन्या महाविद्यालय मिरजच्या विध्यार्थिनींची अभ्यास भेट
*आस्था बेघर निवासी केंद्रास कन्या महाविद्यालय मिरजच्या विध्यार्थिनींची अभ्यास भेट*
कन्या महाविद्यालय मिरज च्या समाजशास्त्र व राज्यशास्त्र विभागाने दि. 14 डिसेंबर रोजी बेघर लोकांच्या सामाजिक समस्या जाणून घेण्यासाठी मिरजेतील आस्था बेघर निवासी केंद्रास सदिच्छा भेट दिली. त्याप्रसंगी पत्रकार व माहिती अधिकार वक्ते श्री.शाहीन शेख यांनी विध्यार्थिनींना सविस्तर माहिती दिली. त्याप्रसंगी त्यांनी बेघर लोकांच्या अस्तित्वाची जाणीव समाजाला होणे आवश्यक आहे, त्यांच्यावर त्यांच्याच घरच्यांनी व समाजतील लोकांनी बेघर होण्याची वेळ आणली आहे, बेघर लोकांना शासन देखील अनुदान देत नाही ते सर्वार्थाने निराधार आहेत. त्यांना आपल्यासारख्या सामाजिक जाणीवा जागृत असलेल्या लोकांच्या मदतीच्या हाताची आवश्यकता आहे . बेघर लोकांना कोणीही प्रेमाने, आपुलकीने बोलत नाही. त्यांना समारंभात,उत्सवात,धार्मिक कार्यात कोणीही सहभागी करून घेत नाही. त्यांना नातेवाईक आहेत पण त्यांनी त्यांना आपल्यापासून दूर लोटले आहे . त्याच्या बाबतीत ते बेफिकीर आहेत. बेघरांचा सांभाळ करताना आमच्या सर्वांची दमछाक होते . त्यांना वेळेवर उपचार देणे, विवाह योग्य असेल तर विवाह लावून देणे, आजारपणात त्यांची सेवा करणे, मतिमंद लोकांना त्यांच्या कलाने संभाळणे, त्यांना खाऊ- पिऊ घालणे, वेळेवर औषध गोळ्या घ्यायला लावणे, कोणी मृत्यू पावल्यास त्यांचा अंत्यविधी आम्हाला स्वतः पार पडावा लागतो. बेघर व्यक्ती दिसल्यास सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच आम्ही त्याला ह्या निवारा केंद्रात आणतो. आपल्याला कोणी असा बेघर व्यक्ती दिसल्यास किव्हा आपल्या आजूबाजूला असा कोणी व्यक्ती राहत असल्यास आम्हाला कळवा असे आव्हान श्री.शाहीन शेख व केंद्र संचालिका सौ.सुरेखा शाहीन शेख यांनी केले. याप्रसंगी मुलीच्या हस्ते बेघर लोकांना जीवनोपयोगी साहित्य देऊन त्यांना आधार देण्याचे काम करण्यात आले मुलींमध्ये सामाजिक जाणीवा विकसित व्हाव्यात म्हणून या अभ्यास भेटीचे नियोजन करण्यात आले होते. अभ्यास भेटीचे संयोजन प्रा.डॉ. गंगाधर बालू चव्हाण व प्रा.डॉ. शबाना हळगळी यांनी केले. याप्रसंगी प्रा.डॉ. कविता सुल्ह्यान, प्रा.डॉ. विनायक पवार ,प्रा.विद्या पाटील व समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र विभागाच्या सुकन्या उपस्थित होत्या.
Sunday, December 10, 2023
भेदभावाचे उच्चाटन करून मानव अधिकाराचे रक्षण करूया - शाहीन् शेख
https://youtu.be/hmKsl5_Nroo?si=wBDard3NH_CQ2jAx
भाषणाचा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी वरील लिंक ला क्लीक करा.
कन्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची जलक्रांती फिशरीजला भेट
कन्या महाविद्यालयात मिरज येथील विद्यार्थिनींची जलक्रांती फिशरीज ला अभ्यास भेट कन्या महाविद्यालयात मिरज येथील समाजशास्त्र व राज्यशास्त्र विभ...

-
‘व्यक्तिमत्त्व विकास’ या पुस्तकाचे मा. विनायकराव गोखले यांच्या हस्ते प्रकाशन मिरज: दि न्यू मिरज एज्युकेशन सोसायटी मिरज या संस्थेचे अध्यक्ष ...