Wednesday, September 13, 2023

समाजशास्त्र विभागातर्फे सामाजिक समस्या या विषयावरील पोस्टर प्रदर्शन संपन्न .


 *मिरजेच्या कन्या महाविद्यालयात समाजशास्त्र विभागातर्फे पोस्टर प्रदर्शन संपन्न*


कन्या महाविद्यालय मिरज, समाजशास्त्र विभागातर्फे भारतातील सामाजिक समस्या या विषयावरील पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रा. डॉ. उल्हास माळकर सर  यांच्या हस्ते संपन्न झाले. सध्या भारतीय समाजाला  अनेक सामाजिक समस्यांनी ग्रासले आहे. सामाजिक समस्यांमुळे समाजाचे सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे. सामाजिक विकासात अनेक अडथळे यामुळे निर्माण झाले आहेत. सामाजिक विकासाची गती वाढवायची असेल तर सामाजिक समस्यांचा प्रभाव कमी होणे अत्यंत आवश्य्यक आहे , ही जाणीव ठेवून समाजशास्त्र विभागाच्या अभ्यासक विध्यार्थिनींनी सामाजिक समस्यांवर पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन केले . त्यात महागाई, बेरोजगारी, आत्महत्या, भ्रष्टाचार, स्त्रीभ्रूणहत्या, दारिद्र्य, संप्रदायवाद , आरक्षणाच्या समस्या, लोकसंख्यावाढ, लिंगभेद, हुंडाबळी, प्रदूषण ,बालगुन्हेगारी, व्यसनाधीनता, आरोग्याच्या समस्या, कौटुंबिक हिंसाचार, घटस्फोट,  झोपडपट्टी, सायबर क्राईम , अंधश्रद्धा, निरक्षरता, अज्ञान अश्या अनेक सामाजिक समस्या घेऊन त्याबाबततीत विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती विकसित व्हावी या उद्देशाने सदरील पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन केले. या प्रसंगी कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. गंगाधर चव्हाण यांनी केले. सामाजिक समस्या कमी करण्यासाठी त्यावर उपाययोजना शोधून त्या उपायांची अंमलबजावी होणे गरजेचे आहे व सामाजिक समस्याचा प्रभाव कमी करण्यासाठी समाजातील सर्व सुजाण नागरिकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे , असे प्रतिपादन प्रा.चव्हाण यांनी  केले. याप्रसंगी महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. सागर पाटील, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.विनायक वनमोरे, प्रा. रमेश कट्टीमनी, प्रा. डॉ. विनायक पवार, प्रा.डॉ.कविता सुल्ह्यान, प्रा.रश्मी फलटणकर, प्रा.डॉ. किरण कदम, प्रा.डॉ.शबाना हळगळी, प्रा. संतोष शेळके व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू, भगिनी आणि समाजशास्त्र विभागाच्या सर्व विध्यार्थिनी उपस्थित होत्या. सदरील कार्यक्रमाचे नियोजन समाजशास्त्र विभागाच्या सर्व विद्यार्थिनींनी केले.














कन्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची जलक्रांती फिशरीजला भेट

कन्या महाविद्यालयात मिरज येथील विद्यार्थिनींची जलक्रांती फिशरीज ला अभ्यास भेट  कन्या महाविद्यालयात मिरज येथील समाजशास्त्र व राज्यशास्त्र विभ...